रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची  कारवाई

औरंगाबाद : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वाळू तस्करीच्या गुन्ह्यात दोन आरोपींसह एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.

गंगापूरमधील नेवरगाव पोलिस पाटील यांच्या ताब्यात असलेल्या नेवरगाव येथील वाळू साठ्यातून चोरून नेवरगाव ते वाहेगाव रोडवर वाळूची अवैद्य वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH 20 DE 4885 यासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एकूण 8 लाख 12,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला आहे. एकूण 4 आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, विष्णू पवार, सुभाष ठोके , गणेश मुसळे यांनी ही कारवाई केली.            

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : 
1. रामदास कृष्णा म्हस्के, रा.वाहेगाव (ट्रक चालक)
2. जयदीप उत्तम गायकवाड, रा.वाहेगाव (ट्रक मालक)
3. सतीश हिवाळे, रा.वाहेगाव (जेसीबी मालक)
4. अज्ञात (जेसीबी चालक).

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :