पदवीची परीक्षा शाळेत; तर शाळेचे विद्यार्थी मैदानात

अतुल पाटील
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पदवी परीक्षेसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी पाठवल्याने गारखेडा येथील गजानन बहुउद्देशीय शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानात परीक्षा द्यावी लागली. तर, पदवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांच्या बाकड्यावर बसून परीक्षा दिली. अधिक क्षमतेच्या महाविद्यालयांना कमी विद्यार्थी दिल्याने हा गोंधळ उडाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना हॉल तिकीटवर जे परीक्षा केंद्र दिले होते, ते शुक्रवारी म्हणजे परीक्षेच्या पहिल्या दिवशी बदलण्याचा प्रताप विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केला आहे

औरंगाबाद - पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शाळेत तर, शाळेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मैदानात सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परिक्षेत हा गोंधळ सुरु आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि ऐनवेळी परीक्षा केंद्रात बदल केल्याने हा प्रकार घडला आहे.

पदवी परीक्षेसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी पाठवल्याने गारखेडा येथील गजानन बहुउद्देशीय शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानात परीक्षा द्यावी लागली. तर, पदवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांच्या बाकड्यावर बसून परीक्षा दिली. अधिक क्षमतेच्या महाविद्यालयांना कमी विद्यार्थी दिल्याने हा गोंधळ उडाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना हॉल तिकीटवर जे परीक्षा केंद्र दिले होते, ते शुक्रवारी म्हणजे परीक्षेच्या पहिल्या दिवशी बदलण्याचा प्रताप विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केला आहे. 

या परीक्षेचे नियोजन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी केले होते. अभियांत्रिकी परिक्षेत विद्यार्थी नगरसेवकाच्या घरात पेपर देत असल्याने त्याचा ठपका ठेवून ज्या डॉ. दिगंबर नेटकेंना कुलगुरुंनी जबरदस्ती पदभार घ्यायला लावला तेच नेटके सध्या संचालक आहेत. निवडणुका, परीक्षा सुरु असताना कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे मात्र दिल्लीत व्यस्त आहेत.