"समृद्धी'विषयी पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

औरंगाबाद - प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील दहा जिल्ह्यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी सोमवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी परिषद होणार आहे. औरंगाबादमधील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात दुपारी एक वाजता ही परिषद होणार आहे. परिषदेनंतर पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्य सरकारने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, या प्रकल्पास विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची, तसेच यासंदर्भात तयार झालेल्या विविध संघर्ष समित्यांच्या भूमिका पवार ऐकून घेणार आहेत. या शेतकरी परिषदेस ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अमरावतीसह 10 जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.