औरंगाबादेत संस्थापक शिवसैनिकांची संघटना

अतुल पाटील
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

शिवसेनेचे माजी पदाधिकारी जे की, सध्या भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे अशा विविध पक्षात आहेत, ते पत्रकार परिषदेस उपस्थिती होते. यात माजी आमदार कैलास पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सुदाम सोनवणे (कॉंग्रेस), अविनाश कुमावत (भाजपा), राजु कुलकर्णी, रमेश सुपेकर, विठ्ठलराव जाधव, विजय पालीवाल, कारभारी जाधव, ऍड. सुहास जोशी होते. संघटनेचा विस्तार मराठवाड्यात होणार असून शिवसेनेचे सात ते आठ माजी आमदार संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद : माजी शिवसैनिकांनी एकत्रित येत संस्थापक शिवसैनिक संघटना स्थापन केली आहे. प्रस्थापित, सरंजामशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगताना सुरवातीलाच खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली आहे. जिल्ह्याचे संस्थापक जिल्हा प्रमुख तथा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शनिवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

शिवसेनेचे माजी पदाधिकारी जे की, सध्या भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे अशा विविध पक्षात आहेत, ते पत्रकार परिषदेस उपस्थिती होते. यात माजी आमदार कैलास पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सुदाम सोनवणे (कॉंग्रेस), अविनाश कुमावत (भाजपा), राजु कुलकर्णी, रमेश सुपेकर, विठ्ठलराव जाधव, विजय पालीवाल, कारभारी जाधव, ऍड. सुहास जोशी होते. संघटनेचा विस्तार मराठवाड्यात होणार असून शिवसेनेचे सात ते आठ माजी आमदार संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. संघटनेच्या आतापर्यंत सहा बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीला पाच हजाराहुन अधिक माजी शिवसैनिकांची उपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला. तसेच यापुढे शिवसेनाच नव्हे तर कुठलाही पक्ष भ्रष्टाचार करत असेल तर, त्याला विरोध करणार असल्याचा निश्‍चय सांगितला. 

संस्थापक शिवसैनिक संघटनेने खासदार खैरेंना टार्गेट करताना कन्नड तालुक्‍यातील मौजे आलापुर व देभेगाव येथील कामात खासदार निधीत 2015-16 मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनाही निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.