माळेगाव पिंप्री शिवारात मजुरांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावा

यादवकुमार शिंदे
बुधवार, 26 जुलै 2017

शेतात खुरपणीचे कामे करणाऱ्या मजुरांवर हल्ले चढवून माळेगाव शिवारातील दहा मजुरांचे जोरदार लचके तोडल्याची घटना घडली.

जरंडी : सोयगाव तालुक्यातील माळेगाव (पिंप्री) शेतीशिवारात काम करत असलेल्या शेतमजुरांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने जोरदार हल्ला चढवून, दहा शेतमजुरांचे लचके तोडल्याची घटना बुधवारी (ता. २६) अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतीशिवारातील खरिपाच्या पिकांच्या मशागत करणाऱ्या, मजुरांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. यामुळे दुपारपूर्वीच शेतीशिवार ओस पडले होते. 

पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने शेतीशिवारात मोठा धुडगूस घातला असल्याने शेतात खुरपणीचे कामे करणाऱ्या मजुरांवर हल्ले चढवून माळेगाव शिवारातील दहा मजुरांचे जोरदार लचके तोडल्याची घटना घडली. दरम्यान, महादू प्रताप परदेशी हा शेतकरी शेतात बांधावर उभा असताना पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपांनी त्याला घेरले व हातावर, पायावर आणि मांडीवर लचके तोडून त्यास गंभीर जखमी केले. त्याच शेजारील एका शेतातील मजुरांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी तुटून पडत दहा मजुरांचे लचके तोडून मजुरांना घायाळ केले. 

दरम्यान याप्रकरणी जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा मजुरांवर उपचार करण्यात येत असून या घटनेतील गंभीर शेतकरी महादू परदेशी यास तातडीने उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतीशिवार ओस पडल्याने शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM