झोक्यात बाळाला झोपवून माता करताहेत शेतमजुरीची कामे

यादव शिंदे
बुधवार, 19 जुलै 2017

जरंडी : सोयगाव परिसरात पावसाच्या आगमनामुळे शेतीचे कामे वेगात सुरू असल्याने मजुरांची चणचण हा शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न बनला आहे. लहान बालके घेऊन महिला मजुरांना शेतात कामासाठी यावे लागत आहे. झाडाच्या उंच भागाला बालकांचा झोका बांधून महिला मजुरांना जोखमीचे काम करावे लागत असल्याने या महिला मजुरांचे अर्धे चित्त बालकांच्या झोक्यावर असते त्यामुळे जोखीम पत्करून महिला वर्गाला निंदणी, खुरपणीचे कामे करावे लागत आहे. 

सोयगाव शिवारात निंदणी,खुरपणीच्या कामांनी मोठ्या प्रमाणात वेग घेतल्याने सध्या सोयगावचे शेती शिवारे शेतमजुरांनी बहरून आले आहे. परंतु महिला मजुरांना त्यांची लहान बालके घरी ठेऊन कामाला येता येत नसल्याने या बालकांचा झोका शेतातील बांधावर उंच वर उडात आहे. त्यामुळे शेतातील बांधावर झोकेच झोके दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेती शिवारात मजुरांच्या कामांसह बालकांचा नागपंचमीचा उत्साह शिगेला पोहचल्याचे चित्र आहे. 

दरम्यान महिला मजूर त्यांच्या बालकांना बांधावर झोके बांधून शेतीकामे करत असल्याने या बालकांची बांधावर निद्रस्त झोप होऊन उंच हवाईची सफरेची ही मौज बालकांना मिळत आहे. परंतु झोक्यातील ही बालके धोक्यातही तितकेच आहे.  

टॅग्स