सोयगावच्या शेतमजुरांचा थाट लय भारी!

यादव शिंदे
रविवार, 16 जुलै 2017

बांधावर स्वतंत्र वाहन
शेतात मजुरांना ने-आण करण्यासाठी मजुरांच्या प्रवासाची सोय शेतकऱ्यालाच करावी लागत असल्याने शेतीच्या बांधावर मजुरांना ने०-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करून वाहनचालाकाचीही देखभालीचे काम शेतकऱ्याकडे आहे.त्यामुळे पिकांची खुंटलेली वाढ शेतकऱ्यांना चांगलीच महागात पडत आहे.

जरंडी : खरिपाच्या पिकांच्या मशागतीची कामे सोयगाव परिसरात रविवारपासून वेगात सुरु झाल्याने, निंदणी, खुरपणीसाठी आलेल्या मजुरांना मोठा भाव आल्याने शेतकऱ्यांना मजुरांना शेतातच दुपारच्या चहाची व्यवस्था करावी लागत असल्याने सोयगावच्या मजुरांचा थाट लय भारी झाला आहे.

सोयगाव शिवारात खरिपाच्या पिकांमध्ये वाढलेले तन त्यामुळे पिकांची खुंटलेली वाढ यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मजुरांच्या निंदनी,खुरपणीसाठी मोठ्या विनवण्या करून शेतात आणावे लागत आहे.त्यातच या मजुरांच्या दुपारच्या चहाची व्यवस्था शेतात मजुरांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहन आदि व्यवस्था करावी लागत असल्याने प्रती दिवस तीनशे रु.रोजगार घेणारे सोयगावचे मजूर हायटेक झाल्याचे चित्र सोयगावला दिसून आले आहे.निंदनी,खुरपणीच्या कामासाठी आलेल्या मजुरांची दुपारची न्याहारी झाल्यानंतर शेतीमालकाला तीन वाजेच्या मजुरांच्या चहापाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.सोयगाव परिसरात सध्या गायब झालेला पावूस येता होवू लागल्याने निंदनी,खुरपणी आणि खते घालण्याचे कामे वेगात सुरु झाली आहे.खरिपाच्या पिकांची पावसाअभावी खुंटलेली वाढ कशी वाढवावी यासाठी शेतकरी काहीही करायला तयार असल्याने मजुरांची चांदी झाली आहे.

शासकीय कार्यालयाप्रमाणे वेळ ठरविली-
शेतात निंदनी,खुरपणीच्या कामांसाठी शासकीय कार्यालयीन वेळेप्रमाणे मजुरांनी वेळ ठरवून घेतली असल्याने सकाळी साडेदहा ते साडेपाच व आठवडीबाजाराच्या दिवशी सुटी असे वेळापत्रकानुसार मजूर शेतकऱ्यांशी करार करून या कामावर येत असल्याने या नियामाशीही शेतकऱ्यांना सहमत व्हावे लागत आहे.

 सोशल मेडियावरून चालतात निंदनीसाठी ऑर्डरी
निंदणी, खुरपणी करणाऱ्या प्रत्येक मजूर सोशल मेडीयाशी जोडलेला असल्याने व्हात्सअपवर निंदनी नावाचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे.या व्हाटसअप गटावर शेतकऱ्याला निंदनीसाठी विनंती टाकावी लागते यावर प्रतिसाद मिळाला तरच मजूर उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांनी समजावे.यामध्ये अनेकांना प्रतीक्षेत राहावे लागत आहे.