वरिष्ठांच्या छळाला कंटाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

औरंगाबाद: ओव्हर टाईमच्या फरकाचा मोबदला देण्यात यावा, असे कामगार उपायुक्‍तांचे आदेश असतानाही त्याकडे दूर्लक्ष केलेच. उलट आगारप्रमुख, स्थानक प्रमुख यांनी अपमानास्पद वागुणूक दिल्याने एका तरुण वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद: ओव्हर टाईमच्या फरकाचा मोबदला देण्यात यावा, असे कामगार उपायुक्‍तांचे आदेश असतानाही त्याकडे दूर्लक्ष केलेच. उलट आगारप्रमुख, स्थानक प्रमुख यांनी अपमानास्पद वागुणूक दिल्याने एका तरुण वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (सोमवार) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

भाऊसाहेब केशवराव ताठे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याऱ्या सिडको बसस्थानकातील वाहकाचे नाव आहे. घटनेपूर्वी त्यांनी लिहलेल्या पत्रात वरिष्ठांकडून छळ झाल्याचे नमुद केले आहे. मागील काही दिवसापासून ओव्हर टाईम व अंतरची नोंद कमी दाखविले जात होती. त्यामुळे ही बाब कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे मांडली होती. त्यांनी याबाबतची सुनावणी घेऊन नियमाप्रमाणे मागील मोबदला देण्यात यावा, असा आदेश विभाग नियंत्रकांना दिला. महामंडळाच्या कामगार अधिकाऱ्यांनी लेखी मान्यही केले. मात्र, वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे आगार प्रमुख पठाण व स्थानक प्रमुख घोडे यांनी खुप त्रास दिला. याची विभाग नियंत्रकांकडे तक्रार करूनही त्यांनी काहीच कारवाई न केल्याने संबधित दोघांनी त्रास सुरुच ठेवला. दोन दिवसांपूर्वी ओव्हरटाईम केला. याची पुस्तिकेवर नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यास संबधिताने खडसावले. याची माहिती घेण्यास गेलो असता सर्वासमक्ष माझा पुन्हा अपमान करण्यात आला. या प्रकारानंतर मी खुप तणावात होतो, त्यातूनच मी आत्महत्येचे पाऊल उचलले. यासाठी आगारप्रमुख, स्थानक प्रमुख व या दोघांना पाठीशी घालणारे विभाग नियंत्रक हेच जबाबदार असतील, असे पत्रात नमुद केले आहे. या घटनेनी एकच खळबळ उडाली आहे. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, "मला आताच कळाले' माहिती घेतो, असे सांगून त्यांनी वेळ मारुन नेली. दरम्यान, ताठे यांची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगीतले.

तक्रार केल्याने बडतर्फ
श्री. ताठे यांनी विष प्राशन केल्याचे समजताच एसटी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी घाटीत गर्दी केली होती. यावेळी उपस्थित पत्रकारांसमोर कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. सध्या रझकारी सुरु असून आम्ही नोटा बदलाची तक्रार केली व न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे माझी बढती रोखल्याचा आरोप चालक मोहम्मद अक्रम यांनी केला. तर तीन प्रवाशांचे पैसे घेवून तिकीट फाडले नाही असा आरोप करत वाहक दत्ता रंगनाथ कुलकर्णी यांना बडतर्फ केल्याचे त्यांनी सांगितले. ताठे सोबत राहतो म्हणून माझी गंगापूरला बदली केली. असे पुरी यांनी सांगीतले. तसेच अधिकारी जाणीवपूर्वक छळ करतात, असा आरोप करीत मी देखील आत्मदहन करणार असल्याचे विजय राठोड यांनी म्हटले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

टॅग्स

मराठवाडा

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

02.21 PM

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ...

12.09 PM

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्...

10.03 AM