औरंगाबाद: एसटी धावू लागली; नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पहाटे पाच वाजेपासून बससेवा सुरळीत झाली . तसेच विभागातील सर्व आगारात बस सेवा सुरू झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रण आर. एन. पाटील यांनी दिली.

औरंगाबाद : पगारवाढ, सातव्या वेतनवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा 16 ऑक्टोबरपासून सुरू असलेला संप न्यायालयच्या मध्यस्तीनंतर मागे घेण्यात आला. यामुळे शनिवारी (ता.21) पहाटेपासून एसटी पुन्हा धावू लागली आहे.

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पहाटे पाच वाजेपासून बससेवा सुरळीत झाली . तसेच विभागातील सर्व आगारात बस सेवा सुरू झाली असल्याची माहिती विभाग नियंत्रण आर. एन. पाटील यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या अभूतपूर्व संपावर सरकारला कोणताही तोडगा काढता आला नाही.यामुळे ऐन दिवाळीत हा संप चार दिवस चालला. यता प्रवाशाचे अतोनात हाल झाले.एसटीचेही कोट्यवधी रुपयांची नुकसान झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा खूपच कामी आहे. या विषयी संप करण्यात आला होता,सरकार ने तो संप मोडीत काढला होता.मात्र हा संप सर्व संघटनाच्या एकजुटीने झाला.दोन दिवस सरकार आणि संघटनाच्या प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. मात्र तोडगा निघाला नाही.परिवहनमंत्री,मुख्यमंत्री यांच्या माध्यस्ती नंतर संप मागे घेण्यात आला नाही.या प्रकरणात न्यायालयाने लक्ष घातले. आणि संघटना संप मागे घेण्याचे सांगितले. त्यानुसार संप मागे घेण्यात आला. चार दिवसांपासुन थांबलेली एसटी चे चाके पुन्हा धावू लागली. औरंगाबाद मध्यवर्तीबस स्थानक, सिडको बस स्थानक, विभागातील सर्व बस स्थानकातून बससेवा सुरू झाली आहे.