श्रमिक तास कमी करणाऱ्या परिपत्रकाची कामगारांनी केली होळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

एस.टी. प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचे निदर्शने 

औरंगाबाद : एस.टी.महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगारांचा श्रमिक तास कमी करण्याचा प्रशासनाने घेतलेल्या एकतर्फी निर्णया विरोधात चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.30) निदर्शने केली. याच वेळी एस.टी प्रशासानाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाची होळी करीत घोषणाबाजी केली. 

एसटी महामंडळाच्या राज्यभरातील दापोडी (पुणे) चिकलठाणा (औरंगाबाद) हिंगणा (नागपूर) या तिन्ही मध्यवर्ती कार्यशाळेतील कामगाराचे श्रमिक तास 200 तासने कमी केले. कार्यशाळेतील कामाचा टाईम व मोशन हा जास्त जात असल्याचे अभ्यास करण्यसाठी असलेल्या तज्ज्ञ समितीच्या लक्षात आले. त्यांनीच दिलेल्या अहवालानुसार श्रमिक तास कमी करण्याची एस.टी. प्रशासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणीचे पत्र कार्यशाळा व्यवस्थापकांकडे आले आहेत. ही माहिती कळताच कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी संयुक्‍त कृती स्थापन करण्यात आली आहे.

याच कृती समितीतर्फे निदर्शने करीत या निर्णयाची परित्रकाची होळी करण्यात आली. याच निर्णयाला विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. श्रमिक तास कमी झाल्याने कमी वेळात अधिक काम करावे लागणार आहे. यामुळे या निर्णयाविरोधात विविध संघटनांची संयुक्त कृती समिती स्थापन करून कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. या आंदोलनात महामंडळाच्या परिपत्रकाची होळी करीत कामगारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :