सरकारने शेतकऱ्यांना फसविले- लोमटे

सुषेन जाधव
सोमवार, 26 जून 2017

9 जूलै पासून सुकाणू समिती करणार राज्यभर दौरे.

औरंगाबाद: सरकारने सुकाणू समितीचा प्रस्ताव धुडकावून लावत मनमर्जीने कर्जमाफीचा निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना फसविले आहे. असा आरोप समितीचे सदस्य तथा स्वराज अभियान-जय किसान आंदोलनाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुभाष लोमटे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.

दोन लाख कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आधी 50 हजार रुपये परतावा केल्याशिवाय उर्वरित दीड लाख रुपयांचे कर्ज माफ होणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री असा कसा निर्णय घेतात ? राज्यातील शेतकऱ्यांनी जगू नये असे त्यांना वाटते का ? कट ऑफ डेट 30 जून 2017 ऐवजी 30 जून 2016 ही तारिख देऊन किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, याची आकडेवारी सरकार देणार का ? असा सवाल त्यांनी केला. समितीतर्फे नऊ जूलै ते 23 जूलै दरम्यान नाशिक येथून राज्यभर जनजागरण दौरा सुरु करणार असून 23 जूलै ला पुण्यात समारोप करणार असल्याचे श्री. लोमटे म्हणाले.

कर्जमाफीवर राष्ट्रवादी गप्प का ?
कर्जमाफीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गप्प असून छगन भुजबळ, अजित पवार यांच्या चौकशीचे धागेदोरे न उलगडण्याचा डाव आहे. असा आरोप कॉम्रेड भिमराव बनसोड यांनी केला.