पत्नीची आत्महत्या; पतीला न्यायालयीन कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या पतीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी दिला. रामेश्‍वर शेषराव जाधव (रा. पाल. ता. फुलंब्री) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

या प्रकरणी रामदास शिंदे यांनी तक्रार दिली होती. रामदास यांच्या बहिणीचा रामेश्‍वर जाधव यांच्याशी विवाह झाला होता. तिला सासरकडून छळ होत असल्याचे तिने माहेरी कळविले होते. त्यातून तिने शुक्रवारी (ता. दोन) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पती रामेश्‍वर, दीर मच्छिंद्र जाधव, सासरा शेषराव जाधव, सासू रुख्मणबाई जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. रामेश्‍वरला रविवारी (ता. 24) न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणी वेळी न्यायालयाने रामेश्‍वर याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी वकील सूर्यकांता सोनटक्के यांनी पोलिसांची बाजू मांडली.

Web Title: aurangabad news suicide crime

टॅग्स