शेअर्स खरेदी-विक्री करणाऱ्या ट्रेडर्सची आत्महत्या

शेअर्स खरेदी-विक्री करणाऱ्या ट्रेडर्सची आत्महत्या

औरंगाबाद - शेअर्सची खरेदी-विक्री करणाऱ्या ट्रेडर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (ता. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास उघड झाला. जितेंद्र दामोदर शहा (४९ रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) असे या मृताचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे ऑनलाइन शेअर्स खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. शनिवारी (ता. १८) रात्री त्यांची पत्नी नातेवाइकांसोबत रुग्णालयात गेली. त्या वेळी शहा यांची आई व मुलगा घरी होते. रात्री जेवणानंतर शहा यांनी बेडरूममध्ये गळफास घेतला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शहा यांना उठविण्यासाठी त्यांच्या आईने खोलीच्या दरवाजावर थाप मारली; परंतु आतून प्रतिसाद आला नाही. त्यांनी ही बाब शेजाऱ्यांना कळविल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास पोलिस नाईक एकनाथ चव्हाण करीत आहेत. 

पैशांच्या वादातून आत्महत्या
आत्महत्येपूर्वी जितेंद्र शहा यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली. यात एका व्यक्तीकडून घेतलेल्या उसनवारी पैशांचा तगादा ती व्यक्ती करीत होती. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा मजकूर चिठ्ठीत आहे, अशी बाब पुंडलिकनगर पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com