औरंगाबाद महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीची विशेष चौकशी

tukaram munde
tukaram munde

तुकाराम मुंढे औरंगाबाद महापालिकेत

औरंगाबाद: महापालिकेत 2010 ते 2014 दरम्यान, लाड-पागे समिती अंतर्गत झालेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणाच्या चौकशीसाठी तुकाराम मुंडे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. चौकशीसाठी पुणे परिवहन मंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवार (ता. 12) दुपारी एकच्या सुमारास औरंगाबाद महापालिकेत दाखल झाले. सायंकाळ पर्यंत चौकशी करून त्याचा अहवाल मुंडे शासनाकडे पाठवणार आहेत. चौकशी गोपनीय असल्यामुळे या संदर्भात आपण काहीही बोलणार नाही असे सांगत त्यांनी बोलणे टाळले.

औरंगाबाद महापालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनूसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करतांना गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. 2010-14 दरम्यान ही भरती करण्यात आली होती. अडीचशे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या या भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर भरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. आज दुपारी महापालिकेत तुकाराम मुंडे दाखल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर आयुक्तांच्या दालनात त्यांनी भरती प्रक्रियेशी संबंधित फाईली चाळून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आयुक्तांची खुर्ची टाळली
तुकाराम मुंडे आयुक्तांच्या दालनात आले तेव्हा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्यांना आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, ती माझी जागा नाही म्हणत त्यांनी स्वतंत्र खुर्ची मागवली. आयुक्तांच्या शेजारीच खुर्ची ठेवली तेव्हा मुंडे यांनी तिथे नको दुसऱ्या बाजूला ठेवा असे सांगत करड्या शिस्तीचे दर्शन घडवले. आपल्या कडक शिस्तीसाठी प्रसिध्द असलेले आणि त्यामुळेच वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंडे महापालिकेत आल्याचे कळाल्यावर चर्चेला उधाण आले होते.

सध्या महापौर, आयुक्त चीनच्या दौऱ्यावर
महापौर भगवान घडामोडे, आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यासह पाचजणांचे शिष्टमंडळ नुकतेच चीन दौऱ्यावर गेलेले आहे. 18 तारखेनंतर हे शिष्टमंडळ शहरात परतणार आहेत. महापौर, आयुक्तांच्या अनुपस्थितीत तुकाराम मुंडे चौकशीसाठी आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com