औरंगाबादमध्ये चोर समजून केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

मनोज साखरे
शुक्रवार, 14 जुलै 2017

  • सोमवारी झाली होती मारहाण
  • घाटीत कुटुंबियांचा आक्रोश
  • डोक्‍यात धारदार वस्तूने वार
  • अर्तंगत जखम झाल्याने मृत्यू

औरंगाबाद : चोरांचा साथीदार समजून तरूणाला उस्मानपूरा भागातील प्रतापनगर येथे मारहाण झाली. त्याच्या डोक्‍यात धारदार वस्तूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 10) दुपारी तीन ते साडेतीनला घडली. या तरूणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 14) घाटीत मृत्यू झाला. मृत्युचे वृत्त समजल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला.

पोलिसांनी सांगितले की, विजय पांडूरंग सदाफूले (वय 35, रा. मिलिंदनगर, उस्मानूपरा) असे मारहाणीत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी संदीप प्रकाश जोशी (रा. प्रशांतनगर, प्रतापनगर) यांच्या गोडावून शेजारी अज्ञात दोन तरूण चोरीच्या प्रयत्नात असल्याचे समजताच नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दगडफेक झाली. ही घटना पाहण्यासाठी विजय सदाफूले गेले. पण नागरिकांच्या कचाट्यात सापडल्यानंतर चोरांचा साथीदार समजून त्यांना नागरिकांनी मारहाण सूरू केली. यावेळी चोरीसाठी आलेले मुळ संशयित पसार झाले.

दरम्यान, अज्ञात नागरिकाने त्यांच्या डोक्‍यात कवचासदृष्य अथवा रॉडने सदाफूले यांना मारहाण झाली असावी. या हल्ल्यात मोठा रक्तस्त्राव सूरू झाला. नागरिकांनी सदाफूले यांना उस्मानपूरा पोलिस ठाण्यात नेले. पण सदाफूले यांना गंभीर जखमी पाहून तेथील पोलिसांनी उपचारासाठी त्यांना लगेचच घाटीत हलवले. सोमवारपासून त्यांच्यावर घाटीत उपचार सूरु होते. डोक्‍यात जोरदार प्रहार बसल्यानंतर अंर्तंगत जखमेमुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा शुक्रवारी सकाळी घाटीत मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीष टाक यांनी दिली. या घटनेप्रकरणी त्यांच्या पत्नी छाया सदाफूले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञाताविरुद्ध खूनाच्या गुन्ह्याची नोंद झाली.

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त