टोमॅटो पन्नास रुपये किलो, भाज्यांची जुडी दहा रुपयांना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद - जून महिन्यात काही प्रमाणात पडलेल्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी, लागवड केल्याने भाजीपाल्याचे क्षेत्र घटले. शिवाय पावसाळी वातावरणात भाज्या खराब झाल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची एक जुडी दहा रुपयांना तर टोमॅटो पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. भाज्यांच्या किंमती वाढल्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

जून महिन्यात अनेक भागांत पाऊस झाला होता. परिणामी पालेभाज्यांचे उत्पादन घटले. त्यातच शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केल्याने भाजीपाल्याचे क्षेत्र सध्या कमी झाले. शिवाय दमदार पाऊस नसल्याने विहिरी, तलावात पाणी नसल्यानेही भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या अनेक भाज्यांचे दर वाढले असून यामध्ये टोमॅटोने सर्वाधिक ‘भाव’ खाल्ला. गुरुवारी (ता. सहा) औरंगाबाद बाजार समितीत १०९ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. होलसेलमध्येच सर्वसाधारण दर हा चाळीस रुपये किलो असल्याने किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. शिवाय मेथी, कोथिंबीर, पालक, शेपूची जुडी प्रत्येकी दहा रुपयांना विक्री होत आहे.