आता औरंगाबादमध्ये वाहन प्रशिक्षणासाठी मोजा 5500 रुपये!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

स्पर्धेमुळे शुल्क कमी घेऊन अर्धवट वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे आता बंद होणार आहे. शहरातील ड्रायव्हिंग स्कुल चालकांनी एकत्र येत यावर तोडगा काढला आहे.

औरंगाबाद - स्पर्धेमुळे शुल्क कमी घेऊन अर्धवट वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे आता बंद होणार आहे. शहरातील ड्रायव्हिंग स्कुल चालकांनी एकत्र येत यावर तोडगा काढला आहे. प्रशिक्षणार्थीला पूर्ण प्रशिक्षण द्यायचे आणि किमान 5500 शुल्क आकारायचे असा निर्णय मालकांनी घेतला आहे.

औरंगाबादेत 75 पेक्षा जास्ती ड्रायव्हिंग स्कूल्स आहे. संख्या मोठी असल्याने या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. यातून शुल्क कमी असतील तेथेच प्रशिक्षणार्थी अधिक असतात. पण कमी शुल्क आकारून नफा वाढवण्यासाठी अनेक ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षणार्थींचे हक्क मारतात आणि किरकोळ प्रशिक्षण देऊन परवाना काढण्यासाठी रांगेत उभे करतात. या प्रकारामुळे अप्रशिक्षित किंवा अर्धप्रशिक्षित चालक तयार होतात. त्यातून पुढे चालून अपघातांची संख्या सुद्धा वाढते. त्यामुळे शहरातील सगळ्या ड्रायव्हिंग स्कुल संचालकांनी एकत्र येत किमान दर हा 5500 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद; जीएसटीमुळे चित्रपटगृहचालक संभ्रमावस्थेत
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
गायीच्या नावे कायदा हातात घेऊ नका : योगी आदित्यनाथ
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक
मोदींकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचे दिसते: दिग्विजयसिंह
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ; अध्यापक विद्यालयांच्या वाट्याला वनवास
औरंगाबाद : पत्रकारावरील लाठीचार्जबाबत हरिभाऊ बागडे यांना निवेदन

मराठवाडा

माजलगाव (हिंगोली) : तालुक्यातील सोन्नाथडी केंद्राअंतर्गत असणा-या सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनिल ज्ञानोबा येळणे...

05.00 PM

औरंगाबाद - येथील राज्य कर्करोग संस्थेमुळे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्‍यात आले आहेत. मराठवाड्यासह विदर्भ,...

01.48 PM

औरंगाबाद - मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा...

01.48 PM