पाण्यावरून सेनेच्या नगरसेवकांत जुंपली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद -  सलीम अली सरोवर परिसरात असलेल्या विंधन विहिरीच्या पाण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत बुधवारी (ता. 23) सर्वसाधारण सभेत चांगलीच जुंपली. सीताराम सुरे यांना विंधन विहिरीचे पाणी देण्यावर मोहन मेघावाले यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये वाद पेटला. शेवटी नगरसेवक राजू वैद्य यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. आता महापौर नंदकुमार घोडेले आयुक्तांसोबत बसून हा वाद मिटविणार आहेत. 

सलीम अली सरोवर परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पालगत महापालिकेने विंधन विहीर घेतली आहे. त्याला मुबलक पाणी असल्याने काही दिवसांपासून शिवसेनेचे नगरसेवक सुरे हे पाणी टॅंकरने नागरिकांना देण्यासाठी नाममात्र दरात घेऊन जात आहेत. मात्र, त्यापूर्वी काही राजकीय मंडळी हे पाणी टॅंकरचालकांकडून पैसे घेऊन विकत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या आदेशानुसार सुरे यांना पाणी देण्यास प्रशासनाने सुरवात केली मात्र त्याला मेघावाले यांनी विरोध केला. पाण्याचे टॅंकर अहोरात्र भरून नेले जातात. त्यामुळे येथील रहिवाशांना त्रास होतो. त्याचबरोबर रस्ताही खराब झाला आहे. नागरिकांना त्रास नको म्हणून येथून टॅंकर भरून नेण्यास मनाई करावी, अशी मागणी मेघावाले यांनी केली. त्यावर सुरे यांनी मेघावाले यांचे म्हणणे खोडून काढले. गेली तीन वर्षे येथून मोफत पाणी भरून नेले जाते. मी रीतसर पैसे भरून पाणी नेतोय. आताच येथील रहिवाशांना त्रास होऊ लागला का? असा सवाल त्यांनी केला. 

भाजप-एमआयएमला गुदगुल्या 
शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद होत असताना भाजप व एमआयएमच्या नगरसेवकांना गुदगुल्या होत होत्या. भाजपच्या काही नगरसेवकांनी तर बेंचही वाजविले! 

Web Title: aurangabad news water issue in amc