औरंगाबाद : भीषण अपघातात ठेकेदार ठार

कायगावजवळ अचानक ब्रेक दाबताच मालवाहू वाहन कारला धडकले
Kayagaon Truck and car road accident
Kayagaon Truck and car road accidentsakal

वाळूजमहानगर : मालवाहतूक करणारे चारचाकी वाहन व बलेनो कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील कामगार ठेकेदार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव जवळ झाला.

वाळूज येथील अविनाश कॉलनीत राहणारे किशोर नानासाहेब कळसकर (वय २८) हे वाळूज औद्योगिक वसाहत व परिसरातील उद्योगांना कामगार पुरवण्याचे काम करत असे. बुधवारी रात्री कळसकर हे बलेनो कार (एमएच २०, एफपी- ९९९३) मधून औरंगाबाद-नगर रोडने जात होते. त्याच वेळी बोलेरो पिकअप (एमएच २०, ईजी-६०९१) च्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील कळसकर यांची कार पिकअपला पाठीमागून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप वाहनातील लोखंडी सळया व अँगल कळसकर यांच्या कारच्या आरपार घुसल्या. यात किशोर कळसकर हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्यांना बजाजनगर येथील खासगी रुग्णालयात व नंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

नियम धाब्यावर, संबंधितांचे दुर्लक्ष

वाळूज औद्योगिक परिसरासह औरंगाबाद नगर रोडवरून अनेक मालवाहू वाहने नियम धाब्यावर बसवून बिनदिक्कतपणे धावतात. विशेष म्हणजे औरंगाबाद नगर महामार्गावर लोखंडी सळया वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनातील लोखंडी सळया वाहनाच्या मागे पुढे पाच ते सहा फुटांपेक्षाही बाहेर आलेल्या असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून संबंधित विभागाने अशा वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी वाळूज परिसरातील कामगारांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com