औरंगाबाद : जमीन बळकवण्याचा प्रयत्न; आरोपींना बेड्या

आरोपीस १८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश
Aurangabad land fake documents fraud accused arrested
Aurangabad land fake documents fraud accused arrestedSakal

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांसह बनवाट साक्षीदार व मालक उभा करुन शेतजमीन बळकावण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्याला वेदांतनगर पोलिसांनी सोमवारी (ता. सोळा) पहाटे अटक केली. चंद्रकांत पिराजी वाघमारे (वय ३६, रा. तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला १८ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी दिले.

जयप्रकाश गंगीले (रा. जिजामातानगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीच्‍या ओळखीचे शिरीष मधुकर देशपांडे (रा. दशमेशनगर) यांची नक्षत्रवाडी गट क्रं.१०६ मध्‍ये एक एकर जमीन आहे. त्‍या जमीनीच्‍या देखरेखीचे काम फिर्यादी करतात, १३ ऑक्टोबर २०२१ रोजी तसे मुख्‍तारपत्र देखील तयार करण्‍यात आले आहे. या जमीनीचे मुळ मालक तथा मयत शेषराव मारुती आगळे यांचे नातेवाईक स्‍वप्‍नील आगळे, विष्णु आगळे आणि बाबासाहेब आगळे यांनी जमीनीची बनवाट नोटरी केल्याने शिरीष देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

त्‍याचा तपास सुरु असतांना शेषराव यांची पत्‍नी इंदुबाई आगळे यांनी १ फेब्रुवारी रोजी न्‍यायालयात बोगस जीपीए दाखल केला, त्‍यात त्‍यांनी शिरीष देशपांडे यांच्‍या नावे असलेली जमीन चंद्रकांत वाघमारे याच्‍या नावे जीपीए करुन दिल्याचे सांगितले. इंदुबाई यांचा दावा १३ एप्रिल रोजी न्‍यायालयाने फेटाळला.

तत्पूर्वी न्‍यायालयात दाखल करण्‍यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्‍यता आली असता, शिरीष देशपांडे यांच्‍या जागी बनवाट व्‍यक्ती उभी करुन त्‍यांचे बनवाट आधार कार्ड, बनावट कागदपत्र, स्‍वाक्षरी आणि साक्षीदार शेख मोहसीन शेख मन्नान (रा. खोकडपुरा) आणि अक्षय सुभाष बोरसे (रा. समतानगर) यांच्‍या आधारे आरोपींनी सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनवाट जीपीए करुन देशपांडे यांची शेत जमिन बळकाविण्‍याचा प्रयत्‍न केल्याचे समोर आले. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी युक्तावाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com