औरंगाबाद : व्यापाऱ्याची दहा कोटींची फसवणूक

शेती खरेदीचा व्यवहार अपूर्ण असतानाही जमीन परस्पर विकली
Trader cheat of 10 crore
Trader cheat of 10 croresakal

औरंगाबाद : दाम्पत्याने व्यापाऱ्याकडून धनादेशाद्वारे चार एकर जमिनीचे खरेदीखत करून घेतले. मात्र, धनादेशाचा व्यवहार अपूर्ण असतानाच या दाम्पत्यासह अकरा जणांनी कट रचून परस्पर विक्री करत तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एक फेब्रुवारी ते चार मार्च या काळात रंगारगल्ली आणि दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात घडला. याप्रकरणी व्यापारी अशोक शिवनारायण जैस्वाल (६७, रा. रंगारगल्ली, सिटी चौक) यांच्या फिर्यादीवरुन तब्बल ११ जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जैस्वाल यांच्या फिर्यादीनुसार नारेगाव येथील गट क्रमांक २४ मध्ये त्यांची चार एकर शेतजमीन आहे. या शेतीच्या विक्रीचा व्यवहार आरोपी अनिल एकनाथ डायगव्हाणे आणि रिता अनिल डायगव्हाणे (दोघेही रा. एमआयडीसी, चिकलठाणा) यांच्याशी धनादेशाद्वारे केला. परंतु व्यवहार अपूर्ण असताना, पूर्ण पैसे जैस्वाल यांना कराराप्रमाणे न देता डायगव्हाणे दाम्पत्याने ही जमीन आरोपी जाहीर गफूर कुरेशी (रा. समतानगर), सय्यद सलिमोद्दीन सय्यद नईमोद्दीन, सईब खान अय्यास खान, शेख नवीस शेख रहीम, मुक्तार महेमूद खान (चौघेही रा. कटकट गेट), अन्सारी मुनावर अली सादात अली (रा. टाइम्स कॉलनी), राईस नवाब खान (रा. रहेमानिया कॉलनी), शेख जाकेर शेख नासीर (रा. किराडपुरा), फैसल अली बारशेद (रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांना परस्पर विक्री केली.

या ११ जणांनी जैस्वाल यांची १० कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच जैस्वाल यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com