कर्जाचे आमिष दाखवत पाच जणांनी केला अत्याचार

धमक्या देत वेश्याव्यवसायासही भाग पाडले; दोघांना अटक
crime woman gang raped lure of loan aurangabad
crime woman gang raped lure of loan aurangabadsakal

औरंगाबाद : विभक्त महिलेला आपल्या जाळ्यात अडकवल्यानंतर गुंगीचे औषध देत अत्याचार करण्यात आला. त्यानंतर व्हिडिओ व फोटो व्‍हायरल करण्‍याची धमकी देत महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपींपैकी दोघांना जवाहरनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. तीन) अटक केली. आरोपींना मंगळवार (ता. आठ) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही. डी. सुंगारे/तांबडे यांनी शुक्रवारी (ता. चार) दिले आहेत.

सुशील जगन्‍नाथ साध्‍ये (वय ३१, रा. गल्‍ली नं.२, पुंडलिकनगर) आणि अजय विष्णू मुळे (२६, रा. रेणुकानगर, पहाडसिंगपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुदर्शन ऊर्फ बापूराव लोहार, रामचंद्र पाटील आणि श्रद्धा सुदर्शन लोहार अशी पसार आरोपींची नावे आहेत.शहरातील एक ३८ वर्षीय महिला २०११ पासून आपल्या तेरावर्षीय मुलीसोबत एकटी राहतेे. वर्ष २०१९ मध्‍ये पीडिता कार घेण्यासाठी एपीआय कॉर्नर येथील शोरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख आरोपी सुशील साध्‍ये याच्‍यासोबत झाली. त्‍याने फायनान्‍सकडून कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली साडेतीन लाख रुपये घेतले. त्यानंतर २७ मे २०१९ रोजी सुशील साध्‍ये आणि अजय मुळे हे दोघे पीडितेच्‍या घरी आले. त्‍यांनी लोन मंजूर झाले म्हणत पीडितेला पेढा खाऊ घातला. त्‍यानंतर पीडिता ही बेशुद्ध झाली. शुद्धी आल्यावर तिला आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे लक्षात आले.

दोन दिवसांनंतर पीडितेने आरोपी सुशीलकडे पैसे परत देण्‍याची मागणी केली असता आरोपीने तिला पाच लाखांचे चेक दिले, मात्र ते वटले नाहीत. आठ दिवसांनी सुशील व अजय पुन्हा पीडितेच्‍या घरी आले, त्‍यांनी मोबाइलमधील रेकॉर्डिंग व्‍हायरल करण्‍याची धमकी देत अजय मुळे याने बलात्‍कार केला. काही दिवसांनी सुशील याने सुदर्शन लोहार याला पीडितेच्‍या घरी आणले, लोहार यानेही बलात्‍कार केला. त्यानंतर पुन्हा कर्जाचे हप्‍ते वेळेवर न फेडल्याने लोहार याने पीडितेच्‍या घरी रामचंद्र पाटील याला आणले. त्यानेही पीडितेवर बलात्‍कार केला. त्‍यानंतर पीडिता व तिच्‍या मुलीला जिवे मारण्‍याची धमकी देत लोहार व त्‍याच्या पत्नीने पीडितेकडून वेश्याव्‍यवसाय करून घेतला. आरोपीच्या पत्नीचे एन-२ सिडको येथील ब्‍युटीपार्लर आहे. त्या ठिकाणी बोलावून धमक्या देत तिच्‍याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. न्यायालयात सहायक सरकारी वकील के.डी. जाधव यांनी युक्तिवाद केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com