औषधच्या वॉकेथॉनप्रसंगी शिंगणे यांचे आवाहन
औषधच्या वॉकेथॉनप्रसंगी शिंगणे यांचे आवाहनsakal

सकस आहाराला प्राधान्य द्या : औषधच्या वॉकेथॉनप्रसंगी शिंगणे यांचे आवाहन

जीवनसत्वयुक्त आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक

औरंगाबाद : सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, जीवनसत्वयुक्त आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे अन्न नागरिकांना मिळावे यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे गुरूवारी (ता. १८) अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ईट राईट इंडिया मोहिमेंतर्गत वॉकेथॉन २०२१ च्या उदघाटनप्रसंगी डॉ. शिंगणे बोलत होते.

औषधच्या वॉकेथॉनप्रसंगी शिंगणे यांचे आवाहन
नांदेड : तूरीवरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन आवश्यक

त्यांच्या हस्ते झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या संचालक प्रिती चौधरी, सहसंचालक संजीव पाटील, अन्न औषध प्रशासन सहआयुक्त उदय वंजारी आदींची उपस्थिती होती. डॉ. शिंगणे म्हणाले, की सर्व रोगांचे मूळ पोटात दडलेले आहे. म्हणून आजच्या धावपळीच्या जीवनात उत्कृष्ट, निकोप, सर्व जीवनसत्त्वे असलेले भेसळमुक्त अन्न सेवन करणे अत्यावश्यक झालेले आहे.

औरंगाबादेत फिरत्या वाहनांद्वारे अन्न तपासणी करण्यात येत आहे. यापुढेही एफएसएसएआयसह अन्न औषध प्रशासन विभाग अन्न तपासणीवर अधिक भर देणार असल्याचेही श्री.शिंगणे म्हणाले. तसेच भेसळ करणाऱ्यांवर पाच लाखापर्यंत दंड, सश्रम कारावास अशी कारवाईची तरतूद असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांनी जंक फूड टाळून दर्जेदार आहारासाठी आग्रही असावे असे सांगितले. तर श्री. गोयल यांनी आरोग्यासाठी वेळेवर सकस आहार घेणे आवश्यक असून सात्विक अन्न सेवन करण्यास प्रत्येकाने प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. वॉकेथॉनमध्ये सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन हर्षा पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com