औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते २३०० रुपये

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १००० ते २३०० रुपये

औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) खरबुजाची १३० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १००० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीला खरबुजाची २० क्‍विंटल आवक झाली. या खरबुजाला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० एप्रिलला ७२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २४ एप्रिलला १२२ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाचा दर ८०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २ मेला खरबुजाची आवक १३० क्‍विंटल तर दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १४ मे ला १७ क्‍विंटल आवक झालेल्या खरबुजाला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com