पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुआ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - पावसाळा सुरू होऊनही अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. सोबतच पशुपक्ष्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्‍नही गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. या परिस्थितीत चांगला पाऊस पडावा, शेती व पशुपक्ष्यांसाठी चारापाणी उपलब्ध व्हावे व देशात सर्वत्र शांतता नांदावी यासाठी रविवारी (ता. 13) मुस्लिम बांधवातर्फे छावणी ईदगाह मैदानावर सामुदायिक दुआ करण्यात आली. 

हजारोंच्या उपस्थितीत विशेष नमाज अदा करण्यात आली. या वेळी अमीर ए शरिया मुफ्ती मोईजउद्दीन कासमी म्हणाले, की जगात पाप, अन्याय, अत्याचार वाढले आहेत. आपण सर्वांनी आपल्या पापाचे प्रायश्‍चित्त केले पाहिजे. हाफीज इक्‍बाल अन्सारी यांनी आपण चांगले कार्य केले पाहिजे. अल्लाहकडे चांगल्या कामासाठी दुआ केली पाहिजे, असे प्रतिपादन केले. दुपारी जामा मशिदीतील इमाम हाफीज जाकेर यांनी पावसासाठी दुआ पठण केली. इमारते शरियातर्फे सोमवारी (ता. 14) आणि मंगळवारीही (ता. 15) पावसासाठी विशेष नमाज अदा केली जाणार आहे.