निधीअभावी घाटीचे नवीन वसतिगृह बंदच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी रुग्णालय) ९६ खोल्यांचे नवीन वसतिगृह उभारण्यात आले आहे. परंतु, फर्निचरअभावी जवळपास सात महिन्यांपासून वसतिगृह रिकामेच आहे. यासाठी आवश्‍यक फर्निचर, पंखे आणि इतर साहित्य खरेदीसाठी निधी नाही. त्यामुळे शासनाकडे २ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, अद्याप निधी मिळाला नाही. परिणामी, निवासी डॉक्‍टरांना यावर्षीही नवीन वसतिगृह मिळणार नसल्याचे चित्र आहे.

सध्याचे वसतिगृह अपुरे पडत असल्याने नव्याने आलेल्या निवासी डॉक्‍टरांच्या निवासाची योग्य सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी मार्ड संघटनेकडून जोर धरत आहे. जागा अपुरी पडत असल्याने नव्या वसतिगृहात मिळतील त्या सुविधेत प्रवेश करण्याची वेळ निवासी डॉक्‍टरांवर येत आहे.

वसतिगृह सुरू करताना केवळ सुरक्षारक्षक आणि पाण्याची सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक खोलीमध्ये किमान एक पलंग देण्यासंदर्भात पडताळणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही सुविधांशिवाय राहण्याची वेळ डॉक्‍टरांवर येणार आहे. अपुऱ्या निवास व्यवस्थेमुळे नव्याने आलेल्या निवासी डॉक्‍टरांची  गैरसोय होत आहे. हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी  मागणी मार्ड संघटनेकडून होत आहे.

टॅग्स