दांडीबहादरांच्या वेतनवाढी बंद करणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

जिल्हा परिषदेत झाडाझडती; तिसऱ्या दिवशी 14 अधिकारी, 37 कर्मचारी गैरहजर

औरंगाबादः जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला ठेंगा दाखवत उशिरा येण्याचे सत्र तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम ठेवले असून, बुधवारी (ता. 24) 14 अधिकारी तर 37 कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या मुख्य कार्यकाऱ्यांनी दांडीबहादर कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्यानंतर वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार असे घडल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनवाढ बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी दिली.

जिल्हा परिषदेत अनेक अधिकारी, कर्मचारी वेळेवर आपल्या कार्यालयात हजर राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी सोमवारपासून (ता.22) सकाळी दहा वाजताच अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यास सुरवात केली होती. पहिल्या दिवशी सोमवारी (ता. 22) 17 अधिकारी तर 144 कर्मचारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला कार्यालयात उपस्थितीत नव्हते. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी (ता.23) सकाळी कार्यालयाची झडती घेतल्यावर 12 अधिकारी, 61 कर्मचारी गैरहजर होते. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.24) उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाला विभागाची पाहणी केल्यावर 14 अधिकारी, 37 कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यामुळे आता जे कर्मचारी सकाळी दहा वाजेच्या आत कार्यालयात येणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावतानाच वेतनवाढ बंद करण्याचा इशारा देण्यात येणार आहे. सलग दोन नोटीस दिल्यास त्यांची वेतनवाढ बंद करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

हजेरी मस्टर दहा वाजता जमा करणार
सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहाच्या अगोदर कार्यालयात हजर असणे आवश्‍यक आहे. ज्यांना काम आहे त्यांनी हालचाल रजिस्टर मध्ये त्याची नोंद करून बाहेर जावे. मात्र अनेक कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे केव्हाही कार्यालयात येत असल्याने आता दहा वाजेच्यानंतर हजेरी मस्टर जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दररोज सकाळी एक अधिकारी सर्व कार्यालयांची झाडाझडती घेणार आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः