पोलिसांसाठी सर्वोत्कृष्ट तपास व जप्तीकरिता पुरस्कार

police
police

नांदेड, ता. २६ : गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्नाकरिता आठ गुन्ह्यांची व सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत याकरिता सात गुन्ह्यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी राज्यातील १५ पोलिस अधिकाऱ्यांची रोख बक्षिस व पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात नांदेडचे प्रदीप काकडे, औरंगाबादचे संदीप गुरमे आणि परभणीचे प्रविण मोरे यांचा समावेश आहे.  

पोलिस खात्यात अज्ञात खून प्रकरणी मारेकऱ्याला शोधणे ही बाब अत्यंत किचकट व तितकीच जोखमीची असते. त्यासोबतच अटक केलेल्या गुन्हेगाराकडून मुद्देमाल जप्त करणे हेही तितकेच जिकरीचे असते. परंतु खात्यातील अनुभव, गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पध्दत ज्ञात करून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्याला शोधणे फार अवघड काम असते. परंतु वजिराबाद पोलिसांनी गु.र.न. १५७/ २०१७ भादवी कलम ३०२, ३९७ प्रकरणातील आरोपीला अटक केली.

तसेच परभणी पोलिसांनी जिंतूर ठाण्यात ग.र.न. २८३/ २०१७ भदवीच्या कलम ३७९, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह मुं. पो.कायदा कलम ३७ (१), १३५मधील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील मोठी मालमत्ता हस्तगत केली. यामुळे नांदेड वजिराबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, नुकतेच औरंगाबाद येथे बदलुन गेलेले संदीप गुरमे आणि परभणीमधील जिंतूर ठाण्याचे प्रविण मोरे यांना सर्वोत्कृष्ट गुन्हे तपास व मालमत्ता जप्तीकरिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांच्यासोबतच सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, शिपाई महेश बडगु (ब.न. २६६८), परभणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. आलेवार, हवालदार मो. बिलालोद्दीन इमामोद्दीन (१७२), राजकुमार पुंडगे (५४७) आणि ताजोद्दीन शेख (१२८३) यांनाही हा सन्मान जाहीर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com