गळक्‍या वर्गखोल्यांना वैतागले विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

जालना - जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, गळक्‍या आणि पडक्‍या वर्गखोल्यांना वैतागून एकलहेरा येथील विद्यार्थ्यांनी चक्‍क जिल्हा परिषदेत मंगळवारी (ता.26) शाळा भरविली.

एकलहेरा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. येथील शाळेच्या इमारतीची दुरवस्था झालेली आहे. शाळा मोडकळीस येण्यासोबतच वर्गखोल्याही पावसात गळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केल्याने विद्यार्थ्यांना भिजत धडे गिरववावे लागत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे याबाबत मागणी करूनही उपयोग झालेला नाही. त्यामुळे परिस्थिती जैसे थे असल्याने वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी पालकांसह थेट जिल्हा परिषद गाठली. सकाळी अकरा वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या दालनासमोर विद्यार्थिनींनी शाळा भरविली. तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थी बसले. दुपारी अडीच वाजेनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांसह ग्रामस्थांसोबत चर्चा करून याबाबत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. त्यानंतर ही शाळा सुटली.

टॅग्स

मराठवाडा

नांदेड: एका अल्पवयीन युवतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. यातूनच सदर युवतीने एका कन्यारत्नाला जन्म दिला....

07.06 PM

४७ हजार २७७ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; २२० कोटींच्या कर्जातून सातबारा होणार कोरा नांदेड: मशागतीसाठी पिक कर्ज काढून शेती...

06.27 PM

9 जूलै पासून सुकाणू समिती करणार राज्यभर दौरे. औरंगाबाद: सरकारने सुकाणू समितीचा प्रस्ताव धुडकावून लावत मनमर्जीने कर्जमाफीचा...

06.27 PM