मुलीचा जन्म झाल्यास वडिलाची दाढी, कटिंग मोफत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

समाजात आजही मुलगा हाच वंशाचा दिवा म्हणून समजले जाते. प्रत्येक महिला आपल्याला मुलगाच व्हावा, अशी अपेक्षा करते. प्रत्यक्षात महिलांनीच मुलीच्या जन्मासाठी आग्रह धरण्याची गरज असून स्त्री जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे. 
-संतोष राऊत, घळाटवाडी

माजलगाव - स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे, मात्र तालुक्‍यातील घळाटवाडी येथील संतोष राऊत यांनी स्त्री जन्माचे स्वागत म्हणून मुलीचा जन्म झाल्यास तिच्या वडिलाची सहा महिने दाढी, कटिंग मोफत करण्याचा उपक्रम सोमवारपासून (ता. 30) सुरू केला आहे. 

घळाटवाडी येथील संतोष भगवान राऊत यांचे गावात श्रेयस जेन्टस पार्लर नावाचे दाढी, कटिंगचे दुकान आहे. या दुकानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामविकास समितीच्या वतीने संतोष राऊत यांनी मुलीचा जन्म झाल्यास वडिलास सहा महिन्यांपर्यंत दाढी, कटिंग मोफत व जन्मलेल्या मुलीचे जावळ मोफत करण्याच्या उपक्रमास सोमवारी सुरवात केली आहे. 

समाजात आजही मुलगा हाच वंशाचा दिवा म्हणून समजले जाते. प्रत्येक महिला आपल्याला मुलगाच व्हावा, अशी अपेक्षा करते. प्रत्यक्षात महिलांनीच मुलीच्या जन्मासाठी आग्रह धरण्याची गरज असून स्त्री जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून हा छोटासा उपक्रम सुरू केला आहे. 
-संतोष राऊत, घळाटवाडी

मराठवाडा

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कामगार कराराचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सातवा...

01.30 AM

सेलू (परभणी): तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणा-या सर्जा-राजाला (...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

औरंगाबाद : जायकवाडी धरणात काल रविवार (ता.20) पासून वरच्या धरणातून पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) दुपारपर्यंत 56....

सोमवार, 21 ऑगस्ट 2017