स्वच्छता निरीक्षकाला मारहाण; रिक्षा फोडली

तोडफोड करण्यात आलेली कचऱ्याची रिक्षा.
तोडफोड करण्यात आलेली कचऱ्याची रिक्षा.

औरंगाबाद - महापालिकेने तयार केलेल्या कंपोस्टिंग पीटमध्ये कचरा टाकण्यास विरोध करीत स्वच्छता निरीक्षकाला बेल्टने मारहाण करून कचऱ्याची वाहतूक करणारी रिक्षा फोडण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. २७) सकाळी चिकलठाणा भागात घडली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी करीत काम बंद आंदोलन सुरू केले मात्र पदाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारी या प्रकरणी चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

कचराकोंडीनंतर चिकलठाणा भागात महापालिकेने कंपोस्टिंग पीट तयार केले आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी मनोज शिरसाठ हा ओला कचरा घेऊन या ठिकाणी गेला असता, इथे यापुढे कचरा आणायचा नाही, असे म्हणत अर्जुन अंकुश बकाल याने विरोध केला. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले हे घटनास्थळी पोचले. तेव्हा बकाल याने बेल्टने मारहाण केली व रिक्षाची काच फोडण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर मारहाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी करीत शेकडो कर्मचारी चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा झाले. या वेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या आश्‍वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारी या प्रकरणी संशयित आरोपी बकाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

वाद घालणाऱ्या कर्मचाऱ्याला माफी 
कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यावरून महापौर, उपमहापौरांनी कानउघाडणी केली. आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले, असा जाब त्यांनी विचारला. यावेळी एका कर्मचाऱ्याने महापौरांना वादग्रस्त वक्तव्य केले. त्याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश महापौरांनी दिले; मात्र कामगार संघटनेचे पदाधिकारी व त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागितल्यानंतर महापौरांनी त्याला माफ केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com