मलेरिया विभागाची यंत्रणा अपुरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

बीड - अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या अभावामुळे पालिकेचा मलेरिया विभागच पंगू झाला आहे. त्यामुळे शहरात धूरफवारणी नसल्याने रोगराईची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

बीड - अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या अभावामुळे पालिकेचा मलेरिया विभागच पंगू झाला आहे. त्यामुळे शहरात धूरफवारणी नसल्याने रोगराईची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

सध्या पावसाला सुरवात झाली आहे. अंतर्गत वादामुळे पालिकेकडून मॉन्सूनपूर्व कामेही झाली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसात नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. याचा फटका वाहनधारकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागला. यातच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, चिकुन गुण्या यासारखे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. या आजारांवर नियंत्रण यावे, यासाठी पालिकेच्या मलेरिया विभागाकडून शहरात धूरफवारणी केली जाते. तसेच पाणीसाठे तपासून तेथे कीटकनाशक औषध टाकले जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून पालिकेत धूरफवारणीच्या केवळ पाच मशीन आहेत. त्यातील एक मशीन अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कीटकनाशक औषधही केवळ आठवडाभर पुरेल एवढेच असल्याने मलेरिया विभाग अडचणीत आहे. याबाबत मागणी केली असल्याचे संबंधीत विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मे महिन्यात पालिकेच्यावतीने शहरातील सात हजार ५७५ घरांमधील २७ हजार ६११ पाणीसाठ्यांची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांना २४९ पाणीसाठे दूषित आढळले आहेत. या जलसाठ्यांमध्ये औषध टाकून डास उत्पत्ती रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 

निम्मेच कर्मचारी
या विभागाला कर्मचाऱ्यांच्या ११६ पदांना मान्यता असली तरी प्रत्यक्षात ५३ कर्मचारीच कार्यरत आहेत. यातील २० कर्मचारी इतर विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे शहरात पाणीसाठे तपासणीचा आकडा कमी होत आहे.

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017