सुशीतील तिहेरी हत्याकांडाचे उकलले गूढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

बीड - सुशी (ता. गेवराई) येथे एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना नुकतीच घडली. सुरवातीला हा प्रकार आत्महत्येचा वाटत असला तरी मृतांच्या शरीरावरील जखमांमुळे हे हत्याकांडाच असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या प्रकारानंतर मृताच्या भावानेही दोन दिवसांनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. दांपत्यासह मुलाच्या आत्महत्येचे गूढ अखेर सात दिवसांनंतर उलगडले असून आत्महत्येचा प्रयत्न करणारा मृताचा भाऊच मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजेंद्र लक्ष्मण पवार (रा. सुशी) असे संशयित आरोपीचे नाव असून तो सध्या फरारी आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशी येथे ३० ऑक्‍टोबरला जयश्री तुळशीराम पवार (वय ३०), तुळशीराम लक्ष्मण पवार (वय ३३), सुरेश तुळशीराम पवार (वय आठ) या तिघांचे मृतदेह गावाजवळील विठ्ठल पौळ यांच्या शेतातील विहिरीत आढळले होते. या तिघांनीही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

दरम्यान, या घटनेच्या तीन दिवसांनंतर मृत तुळशीराम यांचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण पवार याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे वळली. सखोल चौकशी केली तेव्हा त्याने जमिनीच्या वाटणीच्या वादातून सख्खा भाऊ तुळशीराम, भावजयी जयश्री व पुतण्या सुरेश यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून गळा आवळून खून करीत त्यांचा मृतदेह विहिरीत ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अशोक नवनाथ ढगे (रा. खरवंडी, जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून गेवराई ठाण्यात राजेंद्र पवार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी राजेंद्र पवार सध्या फरारी झाला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत तपास करीत आहेत.

Web Title: beed marathwada news tripple murder case solve