जागेसाठी खासदार मुंडेंच्या बनावट लेटरपॅडचा वापर

जागेसाठी खासदार मुंडेंच्या बनावट लेटरपॅडचा वापर

बीड - पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्राला तीन एकर जागा मिळण्यासाठी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे बनावट लेटरपॅड वापरल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.22) रात्री समोर आला. विशेष म्हणजे या लेटरपॅडवरून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून जागा मिळण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणी रुग्णालय व निसर्गोपचार केंद्राच्या ट्रस्टींविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित दीनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र गेवराई तालुक्‍यातील वाहेगाव आमला येथे प्रस्तावित आहे. दोन्ही संस्थांच्या ट्रस्टने रुग्णालय व निसर्गोपचार केंद्रासाठी वाहेगाव आम्ला येथे सर्वे क्र. 47 मधील महादेव देवस्थानची इनामी तीन एकर जमीन मंजूर करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यासाठी बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे लेटरपॅड वापरण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com