आधार लिंक न झालेल्या सेविकांनाही मिळणार मानधन 

आधार लिंक न झालेल्या सेविकांनाही मिळणार मानधन 

बीड - मानधन जमा होणाऱ्या बॅंक खात्याला आधार लिंक असेल तरच मानधन भेटणार असल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांची खात्यांना आधार कार्ड लिंक करण्यासाठी हेलपाटे मारले; मात्र अनेकांचे आधार लिंक झाले नाही; मात्र जून ते डिसेंबरपर्यंत आधार लिंक न झालेल्या अंगणवाडीताईंचे मानधन जुन्या पद्धतीने करण्यात येणार आहेत. 

एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तांनी विशेष मोहीम राबवून सेविकांची बॅंक खाती आधार कार्डशी संलग्न करून त्यांचे मानधन एक जानेवारी 2018 पासून पीएफ एमएस प्रणालीद्वारे अदा करावे, असे आदेश दिले आहेत. राज्यात अंगणवाडी सेविकांची संख्या दोन लाख सात हजार असून, आतापर्यंत एक लाख 85 हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन पीएफएमएस प्रणालीत अदा करण्यात आले. काही सेविकांची बॅंक खाती आधार कार्डशी संलग्न न झाल्यामुळे त्यांचे जूनपासूनचे मानधन रखडले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस आर्थिक अडचणीत आल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने पाठपुरावा केल्यानंतर बॅंक खात्याला आधार कार्ड लिंक नसलेल्यानाही मानधन मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com