माजलगावात ऊस आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग

कमलेश जाब्रस
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

उस उत्पादक शेतक-यांच्या उसाला साडेतीन हजार रूपये भाव द्यावा, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाला तरी भाव जाहिर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन ते तिन दिवसात साखर कारखान्याकडे जाणारी वाहने अडवुन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला

माजलगाव (जि. बीड) - पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतक-यांनी राष्ट्रीय महामार्गावर (क्र. २२२) परभणी फाटा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन आज केले. 

उस उत्पादक शेतक-यांच्या उसाला साडेतीन हजार रूपये भाव द्यावा, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाला तरी भाव जाहिर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन ते तिन दिवसात साखर कारखान्याकडे जाणारी वाहने अडवुन शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत महामार्ग अडविला. या आंदोलनामुळे एक तास वाहतुक ठप्प झाली होती. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

Web Title: beed news: agitation