वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

टाकरवण - टाकरवण परिसरातील शेतकरी रानडुक्कर, हरीण या वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले आहेत. हे प्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची राखण करावी लागत आहे. 

शिवारात खरिपाची तूर, कापूस, सोयबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी झाली आहे.

मात्र हरणांकडून तूर, कापूस या कोवळ्या पिकांना लक्ष्य केले जात आहे. हे प्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने आधीच अडचणीत असलेले शेतकरी हताश झाले आहेत. वन्यप्राणी शेतात येऊ नयेत,  यासाठी शेतकरी अनेक उपाययोजनांचा अवलंब करीत आहेत. शेतात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या लटकवून, बुजगावणे बसवून, झाडाला काचेच्या रिकाम्या बाटल्या बांधून त्याचा आवाज करणे आदी उपाय योजना केल्या जात आहेत. शेतीभोवती तारेचे कुंपण केले, तरी त्याला न जुमानता रानडुकरांचे कळप शेतात मुसंडी मारतात. सुरवातीला फटाक्‍याच्या आवाजाने वन्यप्राणी पळ काढायचे. मात्र हा आवाज नित्याचा व ओळखीचा झाला असून रानडुकरे सरळ शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट शेतकऱ्यांवरच हल्ला करतात.

आधीच पाऊस साथ देईना आणि त्यात हरीण, रानडूकरांनी वैताग दिला आहे. दिवस-रात्र या कोवळ्या पिकांची राखण करावी लागते. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांची कोळी पिके वाचवावी. 
-राधाकिसन धनवडे, शेतकरी