अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अपघात विभागात पाणी

प्रशांत बर्दापूरकर
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

अंबाजोगाई (जि. बीड) : मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अपघात विभागात घोट्याइतके पाणी साचले आहे.

यावेळी विभागात रुग्ण नव्हते म्हणून बरे झाले. पाऊस थांबल्यानंतर कर्मचा-यांना खराट्याने पाणी बाहेर काढावे लागले. रुग्णालयाचा हा अपघात विभाग अद्याप जुन्याच इमारतीत आहे. मोठ्या पावसामुळे छताच्या पन्हाळातही पाणी बसले नाही. त्यामुळे हे उर्वरित पाणी व आलेल्या ओसा-याने अपघात विभागात प्रथमच असे पाणी साचले. बांधकाम विभागाने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :