अंगणवाड्या राहणार बंदच; संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

बीड - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी मानधनवाढ मान्य नसल्याचे स्पष्ट करीत राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाने यापुढेही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीडमधील संत भगवानबाबा प्रतिष्ठान येथे रविवारी (ता. २४) घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या वेळी बैठकीला हजारो महिला कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील अंगणवाड्या बंद असल्याने बालकांची पोषण आहार योजना ठप्प पडली आहे.

बीड येथील संत भगवानबाबा प्रतिष्ठान येथे रविवारी दुपारी राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, उपाध्यक्ष कमल बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हजारो कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संपामध्ये अधिकृत नसलेल्या आणि ज्यांच्या महाराष्ट्रात दोनशे सभासददेखील नाहीत अशा संघटनेला हाताशी धरून महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी तुटपुंजी केलेली मानधनवाढ कृती समितीला मान्य नसल्याचे या वेळी भगवान देशमुख यांनी स्पष्ट केले. मानधनवाढीसंदर्भात सुरू असलेला संप यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या वेळी राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, रजिया दारूवाले, कौशल्या कटारे, गयाबाई सोळंके, सत्यभामा सुपेकर, मंगल थोरात, लता बोबडे, संजीवनी डोंगर, मंगल गुजर, लता चिपटे, वच्छला नाईकवाडे, शीला उजगरे आदींसह हजारो कर्मचारी उपस्थित होते.