बीडला कंत्राटदाराचे घर फोडून पंधरा लाखांचा ऐवज लांबविला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

बीड -  घरातील हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बीड शहरातील स्वराज्यनगर भागात बुधवारी (ता.9) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घरफोडीत दहा ते पंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बीड -  घरातील हॉलच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाटातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बीड शहरातील स्वराज्यनगर भागात बुधवारी (ता.9) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घरफोडीत दहा ते पंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

बीड शहरातील स्वराज्यनगर भागात कंत्राटदार संतोष ढाकणे यांचे घर आहे. त्यांची पत्नी अनिता ढाकणे या जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहेत. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास अनिता ढाकणे या जिल्हा रुग्णालयात गेल्या. यावेळी त्यांची दोन मुले घरी होती. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची मुले घराला कुलूप लावून शाळेत गेली. चारच्या सुमारास अनिता ढाकणे या घरी आल्या असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आपल्या मुलांना आवाज दिला. परंतु घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. घरात प्रवेश करताच त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यांनी बेडरूमध्ये पाहिले असता कपाटही उघडे दिसले. यावेळी कपाटाची तपासणी केली असता रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावून घेत पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे फौजदार भूषण सोनार यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, दरोडा प्रतिबंधकचे श्रीकांत उबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन पुंडगे यांनी भेट देऊन वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. पोलिस अधिकारी, कर्मचारी चौकशीसाठी घटनास्थळी ठाण मांडून होते. 

टॅग्स

मराठवाडा

औरंगाबाद - येथील राज्य कर्करोग संस्थेमुळे महागडे उपचार सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्‍यात आले आहेत. मराठवाड्यासह विदर्भ,...

01.48 PM

औरंगाबाद - मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा...

01.48 PM

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटीत) राज्यकर्मचारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती संघटनेचा दोन दिवसीय संप आज (गुरुवार) सुरू...

01.30 PM