खासगी छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन छळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

बीड - पती-पत्नीतील खासगी क्षणांची छायाचित्रे इंटरनेटरवर टाकून व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार खालापुरी (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता.२५) उजेडात आला. या प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

खालापुरी येथील २१ वर्षीय विवाहितेने या संदर्भात शिरूर ठाण्यात तक्रार दिली आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह खालापुरी येथे एका तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीने त्या दोघांतील शारीरिक संबंधाचे फोटो मोबाईलमध्ये घेतले. हे फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तिला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. याबाबत तिने सासू- सासरे यांच्याकडे तक्रार केली; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय पतीच्या पहिल्या लग्नाची माहितीही तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली. या छळास वैतागून विवाहितेने अखेर सोमवारी शिरूर ठाणे गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, सासू व सासऱ्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: beed news crime