बीडः सरसकट कर्जमाफीसाठी खरात आडगांवमध्ये चुलबंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

शेतकरी रामेश्वर शेजूळ यांचा आत्महत्येचा प्रयत्न

माजलगाव (बीड) : तालुक्यातील खरात आडगाव येथे शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांच्या उपस्थितीत आज (सोमवार) चुलबंद आंदोलन सुरु करण्यात आले असून, शेतकरी रामेश्वर शेजूळ यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यातील खरात आडगाव येथे रविवारी (ता. 23) सरपंच निवृत्ती रासवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी खरात आडगाव येथील ग्रामस्थांनी चुलबंद आंदोलन करण्याचा ठराव घेतला. आज (सोमवार) पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली आहे. श्रावणाचा पहिला सोमवार असताना खरात आडगाव येथे आज शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी गावातील सर्वच घरातील चुली न पेटवता ग्रामस्थांनी या चुलबंद आंदोलनास पाठींबा दिला. यावेळी मोहन शेजुळ, रवी रासवे, हनुमान देवकते, सुंदर रासवे, गुलाब आढाव, गुलाब शेजुळ, किरण शेजूळ, बाबू हाके, बबन देवकते यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी सांगीतले की, 'राज्यातील शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून चुलबंद आंदोलनाची सुरूवात तालुक्यातील खरात आडगाव येथून करण्यात आली.' दरम्यान, नायब तहसीलदार पी. बी.शिरसेवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी तलाठी एस. डी. ठोसरे, पंचायत समिती सदस्य, मिलिंद लगाडे, ग्रामसेवक डी. जी. करे, मंडळ अधिकारी एस. आर. झोंबडे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :