बीडमध्ये दहा हजारांचे कर्ज केवळ 210 शेतकऱ्यांना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

बीड - शेतकरी कर्जमाफीच्या गोंधळामुळे यावर्षी पीककर्ज वाटपावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यासाठी 1927 कोटींचे पीककर्ज उद्दिष्ट असले तरी अद्याप केवळ 146 कोटी नऊ लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. पीक कर्जमाफीचा गोंधळ सुरू असताना शासनाने दिलेल्या दहा हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जाचा लाभ केवळ 210 शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

यावर्षी कर्जमाफीच्या गोंधळामुळे अद्याप शेतकरी नवीन-जुने करण्यास धजवताना दिसत नाहीत. त्यामुळे कर्जवाटपाची गती मंदावून उद्दिष्टाच्या केवळ 7.68 टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. आयसीआयसी बॅंकेने सर्वाधिक म्हणजे 62.17 टक्के पीककर्ज वाटप केले आहे. ऍक्‍सिस बॅंकेने केवळ 1.63 टक्के वाटप केलेले आहे. यावर्षी 1927 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना शेतकरीच बॅंकांकडे येताना दिसत नाहीत. कर्जाचे नवीन-जुने केले आणि माफीबद्दल उद्या नवीन काही नियम लागला तर अशी शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. आतापर्यंत 23 हजार 77 शेतकऱ्यांनी 146 कोटींचे कर्ज घेतलेले आहे.