विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधरांनी नोंदणी करावी: विजयसिंह पंडित

जगदीश बेदरे
शनिवार, 8 जुलै 2017

गेवराई (जि. बीड) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी तमाम पदवीधर तरुणांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

गेवराई (जि. बीड) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी तमाम पदवीधर तरुणांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम चालू आहे. महाविद्यालय आणि विद्यार्थी यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी आपल्या विचाराचे प्रतिनिधी सभागृहात असणे गरजेचे असुन ते निवडून पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करावी. पदवी प्राप्त केल्यानंतर तीन वर्ष पूर्ण केलेल्या पदवीधरांना नोंदणी करण्याच अधिकार आहे. पदवीधर तरुण तरुणींनी नोंदणी फॉर्म, पदवी प्रमाणपत्राची झेरॉक्‍स, आधार कार्डची झेरॉक्‍स घेऊन नोंदणी करावी असेही ते म्हणाले.

मतदार नोंदणी येत्या 10 जुलै पर्यंत सुरू असून ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. गेवराई तालुक्‍यातील सर्व पदवीधर युवक युवती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शेवटी पत्रकात केले आहे.

टॅग्स