बीड जिल्ह्यात उघड्यावर शौचास जाणाऱ्या तेरा जणांना तंबी!

जगदीश बेदरे
रविवार, 2 जुलै 2017

गेवराई तालुक्‍यातील भडंगवाडी, मादळमोही येथे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 13 जणांवर पंचायत समितीच्या पथकाने कारवाई केली आहे.

गेवराई (जि. बीड) - गेवराई तालुक्‍यातील भडंगवाडी, मादळमोही येथे उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 13 जणांवर पंचायत समितीच्या पथकाने कारवाई केली आहे.

सरकारकडून हागणदारीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याकडे अनेक ठिकाणी दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान आज (रविवार) सकाळी सहा वाजता गेवराई तालुक्‍यातील भडंगवाडी आणि मादमोही येथे पंचायत समितीच्या पथकाने उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांवर कारवाई केली. उघड्यावर शौचाला बसलेल्या तेरा जणांना गेवराई येथील पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना उघड्यावर शौचास बसू नये, अशी तंबी देऊन सोडून देण्यात आले आहे.