गेवराईत विजेचा खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

गेवराई - मागील चार दिवसांपासून शहरात विजेचा खेळखंडोबा झालेला असून अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासकीय कामे संगणक बंद पडल्याने ठप्प झालेली आहेत, तर व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली आहे.

गेवराई - मागील चार दिवसांपासून शहरात विजेचा खेळखंडोबा झालेला असून अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासकीय कामे संगणक बंद पडल्याने ठप्प झालेली आहेत, तर व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली आहे.

वर्षभरापासून गेवराई शहर, तालुक्‍यात नियमित उपअभियंता नाही. तसेच शहर अभियंत्याचे पदही सहा महिन्यापासून रिक्त होते. आता नवीन शहर अभियंता रुजू झाले. शहराचे मुख्य ट्रान्सफॉर्मर जळाले असून आणिबाणीच्या परिस्थितीने नवीन अभियंत्यांचे ‘स्वागत’ केले आहे. शहरातील अनेक भागात नवीन वस्त्या व घरे झालेली आहेत. वीज जोडण्याचा आकडा व अन्य ट्रान्सफॉर्मरवरील भार लक्षात घेऊन ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. पाच वर्षापेक्षाही अधिक कालावधीपासून अस्तित्वात आलेल्या नवीन वसाहतींना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविण्यात न आल्याने जुन्या ट्रांसफॉर्मरवरच नवीन वस्त्यांचा भार टाकण्यात आलेला आहे. वाढता भार न पेलवल्यामुळे जुने ट्रांसफॉर्मर सारखे बंद पडत आहेत. कधी फ्युज जाणे, कधी केबल तुटणे, कधी स्पार्किंग होउन ट्रान्सफॉर्मर बंद पडणे असे प्रकार होत आहेत. ट्रान्सफॉर्मरवर असह्य भार झाल्यामुळे शहरातील सर्वच भागात नेहमी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. 

वीज गेल्यानंतर नागरिक लाईनमन, अभियंता यांना वारंवार फोन करतात; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानित केले जाते. या सर्व प्रकाराला नागरिक कंटाळले असून व्यथा सांगावी तरी कुणाला, असा प्रश्न पडला आहे.

मागील चार दिवसापासून शहरात विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाले आहे. परिणामी शहरात विजेचा पुरता बोजवारा उडाला आहे. 

मुख्य ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यानंतर ज्या संवेदनशीलतेने पुढील कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती झालेली दिसत नाही. सध्या शहरातील भागाचा भार ग्रामीण भागातील फिडरवर टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरासह ज्या ग्रामीण भागाच्या फिडरवर शहराचा भाग टाकला आहे त्या ग्रामीण भागातील नागरिकांना विजेअभावी राहणे भाग पडत आहे.

Web Title: beed news mseb