बिंदुसरावरील पर्यायी पूल गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

बीड - डोकेवाडा, भंडारवाडी, कर्झनी तलाव तुडुंब भरल्याने बिंदुसरा धरणात रविवारी (ता.२७) रात्री पाणीसाठा वाढला. कपिलधार धबधब्याचे पाणी नदीद्वारे बिंदुसरा नदीपात्रात वाहू लागल्याने बिंदुसरा दुथडी भरून वाहू लागली. यामुळे बिंदुसरा नदीवरील जीर्ण झालेल्या जुन्या पुलालगत उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून रविवारी सायंकाळी पाणी वाहू लागले. रात्री नदीच्या पाण्यात वाढ होत गेली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने हा पर्यायी पूलच वाहून गेला. ऐन मधोमध पूल वाहून गेल्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा संपर्क तुटला आहे.

दोन दिवसांपूर्वीच्या संततधार पावसानंतर रविवारी बीड तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे डोकेवाडा, कर्झनी तलाव तुडुंब भरले. दोन्ही तलावांतील पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने बिंदुसरा धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. बार्शी नाक्‍यावरील जुना पूल रहदारीसाठी आधीच बंद केलेला आहे. त्याच्या शेजारी उभारण्यात आलेला पर्यायी पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे मोंढामार्ग, नगर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रविवारी सायंकाळीच पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागले होते. रात्री नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यायी पूल ऐन मधोमध वाहून गेला. पूल वाहून गेल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले. सकाळी नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली. पूल ऐन मध्यभागी तुटला असून सिमेंट, वाळू व मोठमोठे दगडही वाहून गेले. पुलाच्या दुरवस्थेने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. 

Web Title: beed news rain bridge