आमदार रमेश कदमांची भायखळा कारागृहात रवानगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

बीड - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील निधी गैरव्यवहाराच्या येथील प्रकरणात आमदार रमेश कदम यांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. "सीआयाडी'च्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कदम यांची पुन्हा भायखळा (मुंबई) कारागृहात रवानगी केली. 

साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या आदेशान्वये महामंडळाच्या येथील कार्यालयाद्वारे पाच कोटी 52 लाख 50 हजार रुपये बॅंकेतून रोखीने काढल्याच्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात झाली. त्यासाठी पुणे "सीआयडी'च्या अधिकाऱ्यांनी आमदार कदम यांना गेल्या मंगळवारी (ता.18) रात्री भायखळा कारागृहातून बीड येथे आणले होते. अधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले व न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायाधीश बी.व्ही. वाघ यांनी कदम यांना 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.