वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

बीड -  शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मित्रनगर भागात पोलिस उपअधीक्षक अनुराधा गुरव यांच्यासह त्यांच्या पथकाने बेकायदेशीररीत्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर वाळूसह पडकला. टिप्परसह एकूण २५ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात वाळूचा व्यवसाय मोठ्या तेजीत चालत आहे.

पोलिसांनी वारंवार कारवाई केल्यानंतरही वाळूच्या वाहतुकीवर नियंत्रण आलेले नाही. जिल्ह्यात वाळूघाटाचे लिलाव झालेले नसतानाही बेकायदेशीररीत्या सर्रास वाळू उपसा सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात घरपोच वाळू मिळत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी वाळूघाटाचे लिलाव झालेले नसल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावत असून जादा दराने वाळू विक्री होत आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलिस उपअधीक्षक अनुराधा गुरव या पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वाळूचा टिप्पर (एमएच १२ एचबी ६२९७) दिसून आला. त्यांच्या टीमने टिप्परसह चालक आणि मालकाला ताब्यात घेतले असून टिप्परसह वाळू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी चालक शेख इरफान (रा. कामखेडा), मालक आवेज इनामदार (रा. झमझम कॉलनी, बीड) यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: beed news sand