सोळंके कारखान्यासमोर शिवसेनेचे जागरण गोंधळ आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने डाॅ. उध्दव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी जागरण - गोंधळ डफडे वाजवुन आंदोलन केले आहे. साखर कारखान्यांनी पहिली उचल तिन हजार रूपये द्यावी, उस दर जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते

माजलगांव - उसाला पहिली उचल तीन हजार रूपये देण्यात यावी या मागणीसाठी लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्यासमोर डाॅ. उध्दव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी आज (शुक्रवार) जागरण - गोंधळ आंदोलन केले. 

तालुक्यामध्ये उस दराचे आंदोलन पेटले असुन उसाचा भाव जाहिर करावा या मागणीसाठी विवीध संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत आहेत. लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्यावर शिवसेनेच्या वतीने डाॅ. उध्दव नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी जागरण - गोंधळ डफडे वाजवुन आंदोलन केले आहे. साखर कारखान्यांनी पहिली उचल तिन हजार रूपये द्यावी, उस दर जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते